सानरा
माझ्या आई वडिलांच्या इतके माझ्यावर प्रेम करणारी, त्या दोघांच्या जीवनाच्या अंतापर्यंत मला सतत मदत करणारी, माझ्या जन्मापासूनचे माझे जीवन संस्कारित करणारी, घडवणारी तिसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात भेटलेली नाही. ते माझे आई-वडील होते, हे देवाने मला या परत न मिळणाया अनमोल मनुष्य जीवनात दिलेले अनोखे व सर्वात मोठे दान आहे. आई-वडिलांनी त्यांच्या वागण्यातून व माझ्या त्यांच्याशी निगडीत असलेल्या आठवणींद्वारा एक 'आधारवड' माझ्या मनाच्या अंगणात लागला आहे. तो मात्र मी जिवंत असेपर्यंत वाढतच राहणार आहे. त्या आधारवडाची फळे माझ्यापुरतीच मर्यादित नाहीत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांसाठी आहेत. कारण तसेच 'आधारवड' त्यांच्याही मनांत आहेत, हे मला आता समजू लागले आहे.
श्रीकांत गो. सरपोतदार