मी एक शिक्षक
माझं आत्मचिंतन :
मी एक शिक्षक आहे याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मी माझं देवत समजतो. शेतकरी जसा शेतीची मशागत करतो त्याप्रमाणे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनाची मशागत केली पाहिजे, असं शेजवलकर म्हणतात. म्हणूनच विद्यार्थीीजगतामध्ये आणि शिक्षकांमध्ये शेजवलकरांबद्दल आपुलकी आहे.
अर्थशास्त्र, वाणिज्य, समाजशास्त्र, व्यवस्थापन विद्या अशा विविध ज्ञानशाखांत डॉ. शेजवलकरांनी आजवरचे आपलं आयुष्य व्यतीत केले. एक निष्ठावंत शिक्षक ही भूमिका त्यांनी समर्थपणे वठवली, अनेक शिक्षण संस्था, समाज केंद्रे आणि व्यवसायगृहे यांच्याशी त्यांचे जवळून व जिव्हाळ्याचे संबंध आले.
डॉ. शेजवलकर या वयातही अध्ययन आणि अध्यापन मनोभावे करतात. ते निवृत्त कधीच झाले नाहीत, गंजण्यापेक्षा झिजणं बरं असं त्यांच मत आहे. शिक्षणात रमल्यामुळे माझं जीवन समृद्ध झाले आणि सार्थकी लागलं असं त्यांना मनोमन वाटतं.
आपल्याला भेटलेली माणसे आणि आलेले अनुभव त्यांचे विशेष डॉ. शेजवलकरांनी सूक्ष्मपणे टिपले. ज्या समाजात आपण वाढलो, त्याचे आपण देणे लागतो, हा विचार त्यांच्या मनात रुजला. म्हणूनच या पुस्तकात त्यांनी आदर्श शिक्षण मंडळीतील सर्व शिक्षकांशी संवाद साधला आहे.