"वाढत्या वयाबरोबर गतकाळ पुनःपुन्हा मनात रुंजी घालायला लागतो... आठवणी आपल्याशी बोलायला लागतात... काही व्यक्ती किंवा प्रसंग यांच्या स्मृतींचे फक्त काही ठिपकेच स्मरणात असतात.. आणि त्यांची रांगोळी तयार होते. श्री. प्रमोद बापट यांनी अशा अनेक रांगोळ्या शब्दरुपाने आपल्या समोर मांडल्या आहेत. त्यांच्या आईवडिलांबद्दल लिहिलेले लेख हे याची साक्ष आहेत. १९६० च्या दशकात आयआयटीतून पदवीधर आणि आयआयएम मध्ये व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण... मात्र त्यांचे पाय कायमच जमिनीवर राहिले...या सर्वच प्रवासातील त्यांचे अनुभव हे नव्याने व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उतरणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे आहेत... आपल्या कथनाच्या ओघात त्यांनी अनेकांची व्यक्तिचित्रे साकारली आहेत... त्यांच्या कथनाचं मोठं वैशिष्ठ्य म्हणजे नेमकेपणा. तोच वाचकाला आपलंसं करतो.”
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.