माझ्या बंधुभगिनीनो! “एक गोष्ट मान्य आहे की प्रजातंत्रीय व्यवस्थेमध्ये राजकारण महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या समर्थ होणे अत्यंत आवश्यक आहे, तरी पक्षाने आपली आंतरिक शक्ती वाढवून राजकीय वर्चस्व खुशाल मिळवावे. पण केवळ राजकीय सत्ताच सर्वश्रेष्ठ मानणे चुकीचे आहे. भौतिक समृद्धीतून शक्ती मिळविण्यापेक्षा शिक्षणाने बलशाली व्हावे. राजकीय शची फसवी, निसरडीही असू शकते. राजकारण तसे एक लहानसे माध्यम म्हणूनच पाहिले पाहिजे. समाज महत्वाचा! त्याची सुख-दुःखे हीच महत्त्वाची, समाजाची शक्ती वाडली पाहिजे. प्राथमिकता समाजाच्या प्रबोधनाला दिली पाहिजे. देशात सुपुत्र निर्माण व्हावेत, वेगवेगळी क्षेत्रे त्यांनी जिंकली पाहिजेत. प्रतिभा आणि कठोर परिश्रमाने त्यांनी राष्ट्रपुननिर्माणाला हातभार लावला पाहिजे. आपली तरुण पिढी राष्ट्रासाठी अहोरात्र झटणारी झाली पाहिजे. त्यांना राष्ट्राचा उत्कर्ष व आपल्या समाजाचे हित समजले पाहिजे. तेव्हाच माझ्या दृष्टीने राष्ट्रधर्माचे पालन झाले असे होईल.”