'खरे सांग? मला गप्पाटप्पा करायला खुप आवडते अगदी शाळेपासून बरं का! स्वत:भोवती अशाच आवडीची मित्रमंडळी जमली तर मग घड्याळाच्या डबीतील काटे गायबच होतात. तसे पाहिले तर माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग 'हा नाटकाच्या रंगमंचावरून जातो. आणि सिनेमा, । टीव्ही सीरियल्स, जाहिराती ह्या विविध पदपथावरून 'भटकंती करतो. सोचतीला कानातील हेडफोन, सुमधुर। 'संगीताच्या तालावर कालक्रमणा करताना मी तल्लीन होतो. पण ही माझी तल्लीनता केवळ खाजगी कधीच राहात नाही. स्वतःच्या अनुभवाच्या पुरचुंडीतील गमतीजमती। खुलवून सांगताना समोरच्याला खुलवत ठेवणे जसे। 'मला खूप भावते तसेच समोरच्याच्या मनातील 'कोंडलेल्या भावना मोकळ्या होत असताना त्या 'संयमाने ऐकण्याइतकी अर्थिगची तार माझी जाड। आहे. वैयक्तिक स्तरावर अडीअडचणी कोणाला नाहीत 'देवा? संवादाची भाषा विरळ होत जाणे हे नाही रुचता 'गड्या आपल्याला. मग काय करावे? बोलावे, बडबडावे, रागवावे. रुसावे, वेळप्रसंगी बंडला पण। 'माराव्या; पण भेटावे एकमेकांना केवळ गप्पाचे। व्यसन' घेऊन आणि औपचारिकतेचे झुगाड दर। फेकूनच.