Your cart is empty now.
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी देशात शांतता नांदणे आवश्यक आहे आणि शांतता हवी असेल, तर आक्रमकांना आक्रमण करण्याच्या विचारापासूनच परावृत्त करणे आवश्यक आहे. त्या साठी देशाला बलशाली व्हावे लागेल कारण-
युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचे सूत्र असे आहे,
“युद्ध नको असेल तर युद्धासाठी सज्ज व्हा’’
म्हणजे तुम्ही युद्धासाठी सज्ज असाल, बलशाली असाल तर आक्रमक आक्रमण करण्यापूर्वी शंभरदा विचार करेल. नव्हे तर, तो आक्रमण करण्याचा विचारच तो सोडून देईल.