Your cart is empty now.
भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्या योग्य आणि विवेकी समन्वयातून कुणाही व्यक्तीस स्वीकृत करण्यात सर्वोत्तम यश मिळत असते. खरं तर काम हेच व्यक्तीच्या प्रसन्न चैतन्याचं लक्षण आहे. कामातील अखंडत्व आणि त्यातील सातत्य हाच त्या व्यक्तीचा आयुष्याचा ऊर्जास्त्रोत असतो. याच्याच विविध पैलूंवर साध्या, सोप्या, सरळ, रसाळ; परंतु वैचारिक सूत्रावर आधारित मांडणी 'फलदायी कार्यसंस्कृती' या पुस्तकात केली आहे. अंतिमतः प्रत्येकालाच आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि आनंद मिळवावयाचा असतो. 'फलदायी कार्यसंस्कृती' या पुस्तकात लेखकाने हेच विचारधन कर्मसूत्रे, स्पष्टीकरण आणि सारांशरूपाने साध्या-साध्या उदाहरणांतून, व्यापक दृष्टिकोनातून मांडलेले आहे. आपण गरीब राहावे आणि अयशस्वी व्हावे, असं कधीच वाटत नाही. सकारात्मक, प्रेरणादायी विचारांची आणि दृष्टिकोनाची अगदी सहज पेरणी या 'फलदायी कार्यसंस्कृती' पुस्तकामधून केली आहे. या पुस्तकाच्या मनन, चिंतन आणि प्रत्यक्ष कृतीतून स्वतःचा व इतरांचा आपल्या कामामुळे फायदा होण्याचा उदात्त विचार या पुस्तकात मांडला आहे. 'फलदायी कार्यसंस्कृती' स्वीकारण्यावर अथवा नाकारण्यावरच व्यक्तीचं यशापयश दिग्दर्शित करणारं आणि कामाचं तत्त्वज्ञान मांडणारं हे पुस्तक आहे .