Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

आज कुणाही माणसाला विचारले, की त कशाच्या शोधात आहेस तर त्याच्याकडून हमखास उत्तर येईल, आनंदाच्या शोधात आहे. आनंद ही माणसाची नितांत गरज आहे, पण तो गवसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आनंद। ही खरे म्हणजे शोधण्याची वस्तू नाही, तर ती उमजण्याची...

  • Book Name: Anandache Dohi (आनंदाचे डोही) By Ramanlal Shah
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 15
  • Barcode 9.78938E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Anandache Dohi (आनंदाचे डोही) By Ramanlal Shah
- +

आज कुणाही माणसाला विचारले, की त कशाच्या शोधात आहेस तर त्याच्याकडून हमखास उत्तर येईल, आनंदाच्या शोधात आहे. आनंद ही माणसाची नितांत गरज आहे, पण तो गवसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आनंद। ही खरे म्हणजे शोधण्याची वस्तू नाही, तर ती उमजण्याची बाब आहे. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, 'आनंद ही कस्तुरीसारखी गोष्ट आहे, आपल्याजवळ असून आपल्याला न आकळणारी! आनंदाचं आत्म्यातून प्रकटीकरण होतं, नंतर ते आपल्याला त्याची अनुभूती देत आणि शेवटी दक्षतेचा इशाराही देत' हा आनंद म्हणजे जीवनाची गुरुकिल्ली आहे, पण ती कुठे कशी लावायची नि आनंदाचं कुलूप कसं उघडायचं ते आपल्याला उमगत नाही, आपली अवस्था होते, '...तुझे आहे तुजपाशी' '...ही चुकलेली जागा शोधण्या साठीचं मार्गदर्शन म्हणजे प्रस्तुत आनंदाचा डोह! या आनंदाच्या डोहात काय-काय आहे | ते प्राचार्य रमणलाल शहांनी या ग्रंथात उलगडून दाखवलं आहे. हे पुस्तक म्हणजे ''...हे तो प्रचीतीचे बोलणे!' चिंता व काळजी मिटण्यासाठी यशाचा मूलमंत्र काय आणि त्यातून सुखदुःखाच्या संगतीनं जीवन आनंदमय कसं करायचं याचा राजमार्ग म्हणजे आनंदाचे डोही! ''आनंदाचं खरंखुरं प्रतीक म्हणजे 'भगवान श्रीकृष्ण! आनंद या शब्दातच 'श्रीकृष्ण सामावला आहे. 'आ' म्हणजे अखेरपर्यंत 'नंद' म्हणजे साक्षात श्रीकृष्ण! जो अखेरपर्यंत आपल्यात सामावला तो आनंद हे समजण्यासाठी भगवान श्रीकृष्णासारखं अलिप्त राहता आलं पाहिजे म्हणजे आनंदाचा शोध संपतो हेच या ग्रंथात सहजसुलभ, प्रभावी आणि प्रवाही भाषेत उलगडत जातं आणि शब्द उमटतात 'आनंदाचे डोही आनंद तरंग..!'