७० वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रीयन विशेषतः ब्राह्मण, ह्या नोकरी करणाया व्यक्तीकडे पाहिले की, त्याच्या संकोचित मनोवृत्तीचा पडताळा बऱ्याचदा येतो. या मनोवृत्तीच्या विरोधात जाऊन लेखकाने धडाडी वृत्तीने व कामाच्या निष्ठेने झोपडीपासून प्रभात रोड पर्यंत केलेला हा प्रवास आहे. नवीन पिढीने हे वाचून स्वतःच्या जीवनातही प्रत्येक संधीचा फायदा व थोडाफार धोका पत्करून नोकरी करताना आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवावी. निर्भीडपणे आपले अधिकारी अथवा मालक यांच्याशी वागून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे यावे, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.