दत्तानंद श्रीपाद चंदावरकर
शिक्षण- बी. ए. (ऑनर्स), एल्. एल्. बी., सी. ए. आय आय बी.
व्यवसाय - निवृत्त बँक मॅनेजर
हे पुस्तक म्हणजे माझ्या ज्ञात व अज्ञात वाचकांशी साधलेला एक प्रेमळ संवाद आहे. माणसे जोडत रहावीत व त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधावा हा माझ्या लहानपणापासूनचा छंद. बँकेत अनेक ठिकाणी केलेल्या नोकरीमुळे माझ्या अंगच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.
ह्या पुस्तकाचे मराठी व इंग्रजी असे दोन भाग आहेत. पैकी मराठी 'रम्य आठवणी'.
ह्यामध्ये मला आलेले वेगवेगळे अनुभव, मला भेटलेल्या अनेक व्यक्ती ह्यांविषयी विस्तृत
आठवणी मी दिलेल्या आहेत.
इंग्रजी भाग Reminiscene ( रेमिनिसन्स) ह्यात मला बँकेत नोकरी करताना आलेले वेगवेगळे अनुभव - ज्यायोगे माझी सर्वांगीण उन्नती झाली व मी कटाक्षाने पाळलेल्या मूल्यांमुळे मला समाजात फार आदराचे स्थान मिळाले.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यांत मी एका नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. त्यापैकीच हा एक प्रयत्न.