२१व्या शतकात ज्ञान, अनुभव, कौशल्यप्राप्ती, अभिनवता व धाडस ह्या पंचसुत्राच्या जोरावर यश प्राप्त होऊ शकते. गरज आहे फक्त इच्छाशक्तीची व कठोर मेहनतीची. आजच्या युवापीढीला अपांरपारिक पद्धतीच्या शिक्षण पद्धतीची व व्यापक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. सतत बदलणाऱ्या व नवनवीन आव्हाने निर्माण करणाऱ्या युगात वावरायचे नियमही सोशल नेटवर्किंग, टॅब्लेट पीसी, मोबाईलमुळे अभिनव बनत आहेत. संगणक क्षेत्रातील आव्हाने ग्रामीण व बिनशहरी भागातील युवकापर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे “संगणक क्रांती" हे पुस्तक. जास्तीत जास्त प्रशाला, महाविद्यालये, ग्रंथालये इथे त्याचे वाचन व्हावे, ही सर्व शिक्षकांना व पालकांना नम्र विनंती.