डॉ. यु. म. पठाण
महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट संतसाहित्यविषयक लेखनाविषयीच्या 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्काराचे मानकरी व संतसाहित्याचे व्यासंगी संशोधक पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेले हे प्रासादिक, रसाळ व प्रबोधनपर निरुपण हिन्दू, इस्लाम (सूफी). बौद्ध, जैन, वीरशैव या धर्मांच्या व वारकरी, महानुभाव, समर्थ, नागेश, न्याय, दत्त इ. धर्मसंप्रदायांच्या महापुरुषांच्या व संतांच्या निवडक वचनांचे साक्षेपी व मूल्याधिष्ठित विवेचन एकत्रितरीत्या या ग्रंथाच्या रुपानं मराठी भाषेत प्रथमच होत असावं. 'गागर मे सागर' अशा स्वरुपाचं हे लेखन संतसाहित्याच्या अभ्यासकांना, अध्यापकांना, संशोधकांना व विविध धर्मांच्या व पंथांच्या अनुनयांना तसेच जनसामान्यांनाही अत्यंत उपयुक्त वाटेल, अशी अपेक्षा आहे.
शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांतील मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठीही या ग्रंथाचा निश्चितपणे उपयोग होईल.
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४११ ००४
दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९