साधारण इ.स. १९८० सालापासून महाराष्ट्रात वास्तू व फेंगशुई या विषयांचा शिरकाव झाला. घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? स्वयंपाकघर कोठल्या बाजूस असावे ? याबद्दल विचार वाहु लागले. दिवाणखाना म्हणजे सर्वांना एकत्र येऊन गप्पा मारणे यासाठी विचारांची देवाण-घेवाण एका ठराविक पातळीवर होणे आवश्यक असते. या करता दिवाणखान्याची रचना वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असावी. अशा तन्हेची रचना नसेल तर दिवाणखान्यात बसलेल्या लोकांत एकवाक्यता होणे कठीण असते, भांडण, तंटे, गैरसमज अशा तऱ्हेचे वातावरण निर्माण होते. स्वयंपाकघराची रचना, ओट्याची दिशा योग्य नसेल तर जेवणाला चांगली चव येणार नाही. अशा तऱ्हेच्या अनेक समस्या राहत्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असतात. यावर काय उपाय केले असता या समस्येवर नियंत्रण ठेवता येईल यावर पूर्वजांनी विचार केला. अभ्यास केला व अनुभव घेऊन काही उपाय शोधून काढले व ते शास्त्रीय विचारात बसविले. या शास्त्राला फेंगशुई असे म्हणतात. फेंगशुई याचा अर्थ वारा व पाणी असा आहे. पृथ्वीचे अस्तित्व ज्या पंचतत्त्वांवर आधारित आहे. त्यातील दोन महत्त्वाची तत्त्वे वारा आणि पाणी यांचा आपल्या जीवनावर अधिक प्रभाव आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू ही स्पंदनांवर आधारित आहे व त्या वस्तूमधून बाहेर पडणारी स्पंदने इतर वस्तूंवर व आपल्या आयुष्यावर परिणामकारक ठरतात. पुढीलप्रमाणे काही प्रयोग करून पहावेत. १) गेली काही वर्षे वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत व अनेक ठिकाणी घटस्फोटापर्यंत वेळ येते. अशावेळी शयनगृहात प्रेमी युगुल (Love Birds) यांचा प्रतिकारात्मक असलेला मोठा फोटो लावावा. त्याचप्रमाणे कुत्रा किंवा मांजर यांच्या पिल्लांचे फोटो लावावेत. घरात छोट्या पिल्लांचे फोटो बघताना आपल्यालासुद्धा त्यांच्या बद्दल प्रेम वाटते. आपल्यात प्रेमाची भावना निर्माण होते व घरात प्रेमाची स्पंदने बावरू लागतात. नवरा-बायको यांच्यातील दुरावलेले संबंध पुन्हा जोडले जातात. २) व्यावहारिक जीवनात अनेक अडचणी येतात. त्यामध्ये आर्थिक अडचण ही फार त्रासदायक असते. यावर अनेक उपायांपैकी तीन पायांचा चिनी बेडूक हा एक प्रतिगात्मक उपाय आहे. या बेडकाने तोंडात एक गोल नाणे पकडलेले आहे. हे नाणे ईश्वराचे प्रतिक मानले गेले आहे. त्यामुळे धनयोगाचा मार्ग मोकळा होतो. ही बेडकाची प्रतिमा घरातल्या द्वारासमोरील आतील भागात अशा तऱ्हेने तिरकी ठेवावी की हा बेडूक तोंडात धन घेऊन आत्ताच आला आहे असे वाटते. वरीलप्रमाणे अनेक उपाय या ग्रंथात दिले आहेत त्यांचा उपयोग करून जीवन समृद्ध करावे. पूर्वी घरामध्ये खेळता वारा असावा याकरता दिवाणखान्यामध्ये झुंबरे लावलेली असत, त्याचप्रमाणे खिडक्यांना काचेच्या फुंकण्यांचे पडदे लावलेले असत. त्यामुळे हवा शुद्ध राहून वातावरण आनंदी व सुखकारक राहते.