कलंदर कलावंतांची कला आणि त्यांची वेगळ्या वाटेची आयुष्यं, झगमगाट, अंधार, उपेक्षा आणि यश अशा व्यामिश्रतेतून ज्ञानदा नाईक त्यातलं माणूसपण शोधतात... लेखणीच्या कुंचल्यातून लोभस शब्द चित्रं रेखाटतात.. मस्त, दिलफेक लावणी गाणाऱ्या घरंदाज सुलोचना चव्हाण, संगीत रंगभूमीचं कुटुंब सांभाळणाऱ्या जयमाला शिलेदार, अखंड ज्ञानदीपासारखे प्रधान मास्तर, मनस्वी कार्यकर्ते आणि कलावंत निळू फुले, पोरवयातच पायात चाळ बांधणाऱ्या उषा चव्हाण, अशी किती तरी माणसं भेटतात... कलेचे, आयुष्याचे, विचारांचे वारू बेभानपणे दौडवतात... ज्ञानदा नाईक त्यांना विलोभनीय शब्दरूप देतात...