ही माझी दोन खंडातील तीन अंकी जीवनसहल, पूर्वाश्रमी चंदेरी दुनियेत नाचणाऱ्या मोराच्या डौलाने घडलेली.
आयुष्यांतील योगायोगाकडे जरा नीट लक्ष देऊन बघतांना घ्यानात आलं की, ही माझी एकटीची वाटचाल नाही. अत्तरार्धात माझे पति, कन्या-नातवंडे पान सहभागी आहेतच पण 'बालतारका मेघा गुप्ते' चंदाराणी समवेत ज्या अनेक मराठी पिढ्या नाच रे मोराच्या तालावर आनंदाने नाचल्या, त्यांचीही ही सहल आहे.
जीवनाच्या कमानीखाली फुलवलेला हा शब्दांचा पिसारा रसिकांना आवडेल अशी आशा आहे.