खेडी बदललीत. कालची राहिली नाहीत. म्हणजे नेमकं काय ? नुसतं बाह्य रूप बदललंय का अंतर्यामी फरक पडलाय ! बळी तो कान पिळी. देव-देवस्की, अंधश्रद्धा गेल्या का ? धनवानासारखी ज्ञानी माणसाला किंमत आली का ? मुजोरीची जागा नम्रतेनं घेतली का ? खेडूत साक्षर झाला, सुसंस्कृत झाला का ? ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार शिरलाय ना ? मग खेडी बदलली म्हणजे काय झालं ? नळाचं पाणी, वीज, काँक्रिटच्या इमारती आल्या. ट्रॅन्झिस्टर, टी.व्ही. वाड्या-वस्तीवर पोचले ! माणसात काही मूलभूत फरक पडलाय का ? - हे चालूच आहे ना ? - अशा काही प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न 'लागीर 'मधे केला आहे.