मंगला गोडबोले
साहित्यसंपदा :
झुळूक, पुन्हा झुळूक, नवी झुळूक, आणि मी, कधी बहर कधी शिशिर, कुंपण आणि आकाश (ललित) कोपरा, खुणेची जागा, गिरकी, गुंडाबळी, सुखी स्त्रीची साडी, मध्य, सहवास हा सुखाचा (कथा) दामले मामा, माई, सुवर्णमुद्रा दाजी काका गाडगीळ, जावेद अख्तर (चरित्र) अमृतसिद्धी पु. ल. देशपांडे (सहसंपादन) आणि इतर अनेक...
विशेष :
सामाजिक जाणिवेने लिहिणाऱ्या लेखिका अशी ओळख. ६० हून अधिक पुस्तकांचे लेखन. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंक यात विपुल लेखन. गोडबोले यांच्या काही पुस्तकांचे कन्नड, गुजराती आणि इंग्रजीतही भाषांतर करण्यात आले आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी आकाशवाणीसाठी श्रुतिका लेखन केले.
पुरस्कार :
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद व विविध वाचनालयांचे, सामाजिक संस्थांचे अनेक पुरस्कार