Your cart is empty now.
'ग्रेगरी डॉसन हा हॉलिवुडमधील एक सुप्रसिद्ध पटकथालेखक आहे. कॉर्नवॉल या रम्य प्रदेशात शांतपणे लेखन करत असताना एका वृद्ध दांपत्याशी त्याची भेट होते व लहानपणच्या आठवणी जागृत होतात. शालेय शिक्षणानंतर लेखक होण्याची स्वप्ने जागवत इंग्लंडमध्ये एका कंपनीत नोकरी करत असताना मि. आलिंग्टन, संगीतासह अनेक कलांत रुची बाळगणाऱ्या त्याच्या तीन सुंदर मुली आणि बार्निस्टनच्या रुपात एक उत्तम मित्र असे सर्वजण त्याला भेटतात. पहिल्या महायुद्धापूर्वीचे ब्रडर्सफोर्ड, आलिंग्टन कुटुंबाची झालेली ग्रेगरीची भावनिक गुंतागुंत एका बाजूस आहे, तर दोन महायुद्धानंतरच्या वर्तमानातील हॉलिवुडचे निर्माते, दिग्दर्शक, त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असलेली सुस्वरुप, संवेदनशील अभिनेत्री एलिझाबेथ व या सर्वांमुळे होणारी नायकाची मानसिक ओढाताण ही झाली दुसरी बाजू. अशा दोन कालखंडातील घटना क्रमाक्रमाने पुढे येतात. यातून नायक आपल्या शाश्वत सुखाचा मार्ग शोधून काढतो.