प्रसिद्ध कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचे अनाहूत पत्र 'ओंकार' ला दाद देण्याकरता हे पत्र. योगायोगाने ही कादंबरी माझ्या हातात आली. तरीही वाचली असतीच असे नाही. 'ऐतिहासिक कादंबरीची मी धास्ती घेतली आहे. वाचली त्याचे श्रेय प्रस्तावनेला. ती वाचताच वाटले की, प्रथमच ऐतिहासिक कादं घरीला एक शहाणा लेखक भेटत आहे. ... हळहळ वारली - मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्यांचा जो लोंढा आला, त्या सर्वांआधी 'ओंकार' प्रसिद्ध होती तर... ... तर ह्या प्रकागला बरेच निकोप वळण लागले असते. तुमच्या भाषाशैलीवर मी खूप झालो, पेशवाईत वावरत आहोत असे वाटू लागले. सर्व पत्रे अस्सल, की निर्माण केलेली ? निर्माण केलेली असतील तर कौतुक करावे तेवढे थोडेच ! _ 'मात' मधील देवनाथचे काव्य अस्सल ! शेवटच्या प्रकरणातील 'अग्निकुंडाचा' उल्लेख तुमचा असेल तर, तर ती मी तिसऱ्या डोळ्याची विलक्षण ताकद समजेन. 'आनंदीबाईला प्रधान व्यक्ती धरून तिच्या संदर्भात घटना घडत जातात. त्यात तुम्ही पूर्णतः यशस्वी झाला आहात. तुमची माणसं वाचून झाल्यावर काही दिवस मनात घोळत राहिली. हे यश फार गौरवास्पदः पण माझ्या मनात विचार आला, ही कादंबरी आनंदीबाईची नाही. या कादंबरीचा नायक तिच्या पानापानातून दडून बसलेला. तो म्हणजे 'अधोगतीची वाट धरलेला एक सहला समाज'. कादंबरीतील माणसं ह्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मनःपूर्वक अभिनंदन