Your cart is empty now.
कोणत्याही शहराची ओळख तिथल्या गगनचुंबी इमारती, आलिशान रस्ते, 'चारचाकी वाहनांची गर्दी किंवा अद्ययावत हॉटेल्स यावरून होत नाही. आपापल्या कर्तृत्वक्षेत्रातील उच्च शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महान व्यक्तींच्या संपन्न योगदानाने शहराची शान वाढत असते. प्रतिभावान प्रज्ञावंतांच्या मांदियाळीने ज्या शहराची माना अभिमानाने उंचावली आहे. अशी पुणे ही एक पुण्यनगरी आहे. शक्ती आणि बुद्धी यांची शेकडो वर्षांची वैभवसंपन्न परंपरा या शहराला लाभली आहे. या थार परंपरच। पाईक असणाऱ्या आजच्या निवडक प्रज्ञावंत पुणेकरांची ओळख प्रस्तुत पुस्तकात करून देण्यात आली आहे. त्यात शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, संशोधक, वैज्ञानिक, योद. साहित्यिक, दिग्दर्शक, कलावंत अशा विविध क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश आहे. एखाद-दसरा अपवाद सोडला तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या। या सर्व व्यक्ती स्वतः आपल्या यशोमंदिराच्या शिल्पकार आहेत. कसोटीला उतरणारी। बुद्धिमत्ता. प्रचंड आत्मविश्वास, कामावरची नितांत श्रद्धा, सामाजिक जबाबदारीच। भान. आव्हाने पेलण्याचे मानसिक सामर्थ्य, अपयशाने न खचणारी आणि यशाने। हुरळून न जाणारी समतोल वृत्ती इत्यादी असामान्य गणांवरच या प्रज्ञावंतांनी आपल्या आयुष्याचे आणि भोवतालच्या समाजाचे सोने कल आहे. लेखिका संध्या देवरुखकर। यांनी अत्यंत आत्मीयतेने यातील प्रत्येक व्यक्तीचे अंत:करण अलवारपणे उलगडल। आहे. प्रत्येकाबरोबरचा सहज संवाद आणि त्याच्या यशाचा उलगडा करणारे भाष्य यामुळे या ग्रंथाचे स्वरूप परिचय ग्रंथासारखे न राहता, त्याला एका लालित्यपूर्ण चित्रफितीचे रूप आले आहे. पुस्तक वाचताना त्या त्या व्यक्तींच्या सहवासाचा आनंद 'आपणही अनुभवत राहतो हेच या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.
- अश्विनी धोंगडे