प्रारंभ
एखादा महायोगी जसा निखाऱ्यावरून चालत जाऊन आपलं 'व्हिजन' सिद्ध करतो. तसा कवी अनुभवाच्या आगीला सामोरं जाऊन आपल्या अंतर्मनातलं विश्व रूपसिद्ध करत असतो.
अशी सच्ची कविता ऐकताना जी सहजस्फूर्त दाद दिली जाते. एरवी समीक्षेचा काथ्याकूट आपण नाही. तरी आणखी कोणी करतच असतो.
ती खरी.
पण वाऱ्यानं फूल हलावं, तितक्या सहजतेन ओठावर 'वा, वा' येतं. तेव्हा मग ती पूर्ण कविता, कवितेची एखादी ओळ, एखादा शब्दसुद्धा देवाचा शब्द असतो, असं मला वाटतं.
सगळी स्वत्वाची जाणीव
तिथं कवी आणि रसिक या उभयपक्षी मावळलेली असते. आणि उरतो फक्त अर्थवलयांकित शब्द ज्याच्यासाठी तुम्ही-आम्ही काळीज अंथरायला तयार असतो ।