Your cart is empty now.
श्री. उमाकांत कुर्लेकर
जन्म व शिक्षण पुणे येथे नूतन मराठी विद्यालय महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स व इंडियन सॉ सोसायटीचे लॉ कॉलेज. १९५३मध्ये बी.कॉम. व १९५५ मध्ये एल. एल. बी. १९५५ ते १९५६ या दोन्ही वर्षी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या शासकीय सेवांसाठी होणान्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. १९५७ मध्ये सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिसमध्ये प्रवेश करून दिल्लीस गमत
मुंबई येथे १९५८ ते १९६२ इंडियन कंपनीचे संस्था ९ ते १९७० येथे ओर कंपनी ऑफिसर व सेक्रेटरी हा सुमारे आठ वर्षांचा काळ सोडून बाकी
वै. प्रा. शांताराम कुर्लेकर
दिल्ली येथे निरानराळ्या मंत्रालयामध्ये निरनिराळ्या पदावर काम केले जनता पक्षाच्या शासनात वाणिज्य मंत्री श्री. मोहन धारिया यांच्याबरोबर त्यांचे विशेष अधिकारी म्हणून (ओ.एस.डी.) काम केले (१९७८). अखेर ऑगस्ट १९९० मध्ये केंद्रीय खाद्य व नागरी पुरवठा मंत्रालयातून डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. १९९३ पासून पुणे येथे स्थायिक
या सर्व काळात व सर्व ठिकाणी घराण्यात चालत आलेली धार्मिक उपासना कटाक्षाने सांभाळली. नागपूर येथे श्रीजनार्दनस्वामींकडून योगाभ्यास शिकून घेतला. १९७३ मध्ये श्रीगुळवणी महाराजांपासून शक्तिपात दीक्षा व पुढे १९८० मध्ये श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचेकडून मंत्रदीक्षा मिळाली. कॉलेजमध्ये असल्यापासून श्रीगुरुचरित्राचे पारायण करीत. पण १९६८ मध्ये नागपूर येथे ओळीने २१ पारायणे केली. श्रीगुरुचरित्रावर लेखन करून विशेष अर्थ स्पष्ट करावा अशी प्रेरणा होऊन अनेक वर्षे चिंतन, मनन, वाचन, अभ्यास यात घालविली. दिली येथे मराठी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नेहमी सक्रीय सहभाग घेत असत व दरवर्षी श्रीवासुदेवानंद सरस्वती व श्रीगुळवणी महाराज यांच्या पुण्यतिथ्या आपल्या घरी साजऱ्या करीत.
दिल्ली येथे जनकपुरीमधील श्रीदत्त विनायक मंदिरात, रामकृष्णपुरम् येथील श्रीविठ्ठल मंदिरात व श्रीमुक्तानंद स्वामींच्या परिवाराच्या आश्रमात गीतेवर मराठी व इंग्रजीतून प्रवचने केली होती. पण लेखन कधी केले नाही. पुण्यास स्थायिक झाल्यानंतर १९९५ मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर, नागपूरला असल्यापासूनचा लेखनाचा विचार पक्का केला आणि १९९८ नंतर सुमारे अडीच वर्षात हा ग्रंथ लिहून पुरा केला.