आजचा काळ तर कमालीचा संघर्षाचा आहे आणि उत्कर्षाशिवाय पर्याय नाही. परंतु हा उत्कर्ष करायचा कसा, त्याचे तंत्र काय याची कल्पाना नाही. याचा मार्ग माहीत नाही. हाच मार्ग वाचकांना या पुस्तकातून मिळणार आहे. हा मार्ग अंगिकारला की उत्कर्ष निश्चित. श्रद्धा, महत्त्वाकांक्षा, निरीक्षणशक्ती, प्रयत्न यांचे आपल्या आयुष्यात नेमके काय स्थान आहे. त्याचे महत्त्व काय आहे ते या पुस्तकातून कळेल. आपला उत्कर्ष दुसरं कोणी करत नाही तर आपणच करू शकतो. हे या पुस्तकातील उदाहरणं वाचून कळेल.