Rs. 150.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले जन्म: २१९ १९२५ कास्प, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र अशा तिन्ही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. मुंबई व महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण खात्यात सहाय्यक संचालक, कार्यकाल न संपताच स्वेच्छानिवृत्ती. भारतीय समाजकल्याण संस्थेच्या भारताच्या प्रमुखपदी नेमणूक. भारत...

  • Book Name: Vayovardhan Ani Adhyatmikta (वयोवर्धन आणि अध्यात्मिकता) By Sharrachandra Gokhale
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 26
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Vayovardhan Ani Adhyatmikta (वयोवर्धन आणि अध्यात्मिकता) By Sharrachandra Gokhale
- +
डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले जन्म: २१९ १९२५ कास्प, आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र अशा तिन्ही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. मुंबई व महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण खात्यात सहाय्यक संचालक, कार्यकाल न संपताच स्वेच्छानिवृत्ती. भारतीय समाजकल्याण संस्थेच्या भारताच्या प्रमुखपदी नेमणूक. भारत सरकारचे सल्लागार, गोवा राज्याच्या नियोजनाचे पहिले सल्लागार. आंतरराष्ट्रीय समाजकल्याण संस्थेच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे प्रमुख, असिस्टंट सेक्रेटरी जनरल युनायटेड नेशन्स, यूनिसेफ, डब्ल्यू. एच. ओ. यांचे सल्लागार म्हणून इराण, श्रीलंका, बांगला देश, फिलिपाइन्स, कोरिया, नेपाळ या देशात नेमणूक. भारतात परतल्यानंतर केसरी वृत्तपत्राचे विश्वस्त आणि संपादक. सकाळ वृत्तपत्राचे विश्वस्त सल्लागार. डॉ. गोखले हे केसरी या मराठी वृत्तपत्राचे आणि तीन इंग्रजी मासिकाचे संपादक होते. भारत सरकारच्या नियोजन मंडळाच्या वयोवर्धन व अपंग पुनर्वसन समितीचे अध्यक्ष यूनोच्या माद्रीद येथील महासभेसाठी सदस्य. भारत सरकारच्या वयोवर्धन धोरण समितीचे सभासद. डॉ. गोखले यांनी एकूण ४५ पुस्तके मराठी आणि इंग्रजीत लिहिली. यातील काही पुस्तकांचे चिनी आणि फ्रेंच भाषांतर झाले आहे. अनेक पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या व्यवस्थापन समितीचे आणि ॲकॅडेमिक कौन्सिलचे सदस्य. त्यांना पुढील पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार (कुष्ठ कार्यासाठी), आंतरराष्ट्रीय बिर्ला पुरस्कार (मानव सेवेसाठी). आय.एल.सी.चा अध्यक्षीय पुरस्कार (समाजसेवेसाठी) कॅनडा. सासाकावा पुरस्कार (डब्ल्यू. एच्.ओ.) जिनिव्हा (कुष्ठ कार्यासाठी). यूनोचा महासचिव पुरस्कार (वयोवर्धन क्षेत्रासाठी) (न्यूयॉर्क) यूनोला संबोधित करण्यासाठी सेक्रेटरी जनरल यांचे निमंत्रण. हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय जे. आर. डी. टाटा व दुसरे डॉ. शरच्चंद्र गोखले.