Your cart is empty now.
अंधारातील प्रकाशवाटा" ह्या पुस्तकातून लेखकाने विचारांची सक्षमता, सकारात्मकता, जीवनाकडे बघण्याचा आणि तसे जगण्याचा अत्याधुनिक कालसुसंगत दृष्टिकोन मांडला आहे. " प्रत्येक व्यक्तीच्या वर्तन-व्यवहाराचे सूत्र विचारांशी जोडलेले असते. हे लेखकाने ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून साध्या-सोप्या, सरळ पण प्रभावी भाषेत मांडले आहे. वय, अनुभव, शिक्षण, निरीक्षणाने आयुष्याचे क्षितिज विस्तारत जाते. तेव्हा व्यक्तीस सकस आणि उपयुक्त विचारांची गरज असते. त्याचा नेमका वेध ह्या पुस्तकातून पानोपानी घेतला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांना उद्देशून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असा उल्लेख केलेला आहे. तसाच सखोल आणि व्यापक उद्देश ठेवून "अंधारातील प्रकाशवाटा" हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे.