Your cart is empty now.
कलाकृतीच्या अनुभवाचे मूल्य कोणते ? या प्रश्नाच्या उत्तरातच कलेची थोरवी गवसते. त्यासाठी कालाविश्वाच्या बाहेरच्या जिवंत जीवन प्रवाहात आणि भौतिक जीवन व्यवहारात हा शोध पूर्ण होतो.
कालावादाच्या नावे पुढे आलेली समीक्षा तंत्रवादात बंदिस्त झालेली आहे. जीवनवादी समीक्षा बोधात वाहताना दिसते. इतर समीक्षा पद्धती एकाच अंगाचा विचार करत आहेत.
वस्तुनिष्ठता, मुल्यात्माकता आणि सौंदर्यतत्व यांच्या संयोगातून श्रेष्ठ कलाकृती सिद्ध होते. या सत्याला पोटात घेणाऱ्या इहवादी दार्शनिक भूमिका आकळून मराठीतील कादंबरी, नाटक, कविता, कथा , आत्मकथा यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मूल्यमापन विवेकवादी भूमिकेतून समतोल समीक्षा या ग्रंथात सिद्ध केलेलं आहे.