Your cart is empty now.
सद्यःस्थितीत पाल्य मुला-मुलींना, त्यांच्या बाल्यावस्थेपासून किशोरवयीन ते युवावस्थेपर्यंत घडविणे, वाढविणे आणि विकसित करणे ही पालक आई-बाबांसमोरील अवघड आणि गुंतागुंतीची समस्या बनलेली आहे. भविष्यातही या समस्यांची तीव्रता वाढतच जाणार आहे. त्या सर्वांचा वेध लेखक प्रा. डॉ. यशवंत पाटील (सर) यांनी 'पालकनीती सूत्रे' ह्या पुस्तकात अत्यंत अभ्यासूपणे, समस्यांच्या मुळाशी शिरून, खोलात जाऊन संशोधनात्मक पद्धतीने घेतला आहे. या पुस्तकाच्या मदतीने सद्यःस्थितीतील पालक आई- बाबांस त्यांच्या पाल्य मुला-मुलींस वाढविता, घडविताना एक वेगळ्या प्रकारचा निखळ ममताळू, स्वानंद निश्चितच लाभणार आहे. परिपक्व, सक्षम, सुसंस्कारक्षम, सुशिक्षित पाल्य मुलं-मुली ही प्रत्येक पालक आई-बाबांची आयुष्यातील उत्कट इच्छा असते. ती इच्छापूर्ती ‘पालकनीती सूत्रे' या पुस्तकाद्वारे निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.