"कारण आणि सकारण" हे कमलाकर गुणे यांनी लिहिलेले पुस्तक आत्मचरित्रात्मक आठवणी, किस्से, लघुनिबंध आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींची वर्णने या सर्वांचे एक सुरेख मिश्रण आहे.
श्री. गुणे यांची लेखन शैली ही प्रवाही तसेच वाचकांना आनंद देणारी आहे.
त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आहे. तसेच नर्म विनोद हे श्री. गुणे यांचे वैशिष्ठ्य
आहे. जीवनात अनुभवास येणारी विसंगती व समानता ते चांगल्याप्रकारे
टिपतात व वाचकांपर्यंत पोहचवितात.
श्री. गुणे यांच्या समृद्ध व विविधतेने जगलेल्या जीवनामुळे अनेक विषयांचा परामर्ष त्यांनी या संग्रहात घेतलेला आहे. प्रसंगाचे कथाकथन वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. प्रत्येक किस्सा हा स्वतंत्र आहे. त्यामुळे पुस्तक तुम्ही कोणत्याही प्रकरणापासून वाचू शकता.
मराठी वाचकांना हे काहीसे परिघाबाहेरील लेखन निश्चितच आवडेल यात शंका नाही.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.