'खेळणीवाला' या बालकथासंग्रहात परिकथा, कल्पित रम्यकथा यापेक्षा वेगळे काही देण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. या बालकथात समाजातील साधीसुधी पात्रे आलेली असून मुलांना सत्यासाठी लढणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे, समाजासाठी आपण काही देणे लागतो अशा सद्गुणाची ओळख होईल. मनोरंजनाबरोबरच नवीन काही वेगळे वाचल्याचाही अनुभव येईल. 'खेळणीवाला' या बालकथारूपी पुष्पगुच्छातील प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे, गंध वेगळा आहे. प्रत्येक कथेची स्वतःची अशी खासियत आहे.