लिपीका पासुन ते तहसिलदार पर्यंत ही मुलकी खात्यातील एकूण ३९ वर्षांची सेवा. नोव्हेंबर १९७१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पुणे विभागांत सर्व प्रथम, मंडळाधिकारी निवासीनायब तहसिलदार व तहसिलदार या पदांचा अनुभव. पहिले पुस्तक 'गवसलेले आधुनिक दशावतारी' या पुस्तकास उत्कृष्ट प्रतिसाद, हे पुस्तक सर्वांना भावले. नोकरीत असताना कुटुंब नियोजन, सैनिक नीधि, प्रौढ साक्षरता इत्यादी कामासाठी सन्मानित करण्यात आले आहे.