वसुधा देशपांडे ह्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजीत विशेष शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मिडलइसेक्स विद्यापीठ (यु. के.) इथून मानसशास्त्रातील उच्च शिक्षण घेतले. युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स (यु. के.) मधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणही घेतले. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांसाठी त्या कार्यरत आहेत. कौन्सेलिंग क्षेत्रात काम करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. ह्या क्षेत्रात काम करताना, करिअर कौन्सेलिंग, नात्यातील तणाव, वर्तनविषयक समस्या, आत्मविश्वास निर्मिती असे विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांचा अनुभव, निरीक्षण आणि अभ्यास ह्यांचा संगम.