Rs. 349.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

नवसंशोधन जिवंत राहिल्यावर रोजगारही आमच्याच ताब्यात राहातील

सामुदायिक भांडवलशाही हा मराठी वाचकानाच नव्हे अर्थशास्त्रालाच अपरिचित शब्द आहे. अमेरिकेतील सेमी कंडक्टर (अर्धवाहक) उद्योगाचा खोलवर अभ्यास करताना एका भारतीय अभियंत्याला दिसलेला हा राजमार्ग आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा 'अपेक्षित मुळे' यांचा...

  • Book Name: Samudayik Bhandwalshahi (सामुदायिक भांडवलशाही )by Apekshit Muley
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 10
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Samudayik Bhandwalshahi (सामुदायिक भांडवलशाही )by Apekshit Muley
- +
नवसंशोधन जिवंत राहिल्यावर रोजगारही आमच्याच ताब्यात राहातील

सामुदायिक भांडवलशाही हा मराठी वाचकानाच नव्हे अर्थशास्त्रालाच अपरिचित शब्द आहे. अमेरिकेतील सेमी कंडक्टर (अर्धवाहक) उद्योगाचा खोलवर अभ्यास करताना एका भारतीय अभियंत्याला दिसलेला हा राजमार्ग आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा 'अपेक्षित मुळे' यांचा नवा सिद्धांत या पुस्तकात चर्चिलेला आहे.

चारपाचशे चौ. फूट जागा व्यापणारा कंप्युटर माणसाच्या हातात दिसू लागला. मनाच्या वेगाने किचकट प्रश्नांची उकल करण्यात इलेक्ट्रॉनीक उद्योगाने क्रांतीच केली. तरीही जागतिक अर्थव्यवस्था कुंठित का झाली? याचा अभ्यास व उपाय या पुस्तकात वाचायला मिळतो. जगातील प्रमुख, बहुखंडीय कंपन्यातील भाग भांडवलापैकी ५१% ताबा हा तिथे काम करण्याऱ्यांच्या मालकीचा असेल तर ? वाढलेल्या उत्पादन क्षमतेप्रमाणे वेतनवाढ झाली तर क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेतील मागणीही वाढेल अशा प्रकारचा प्रयोग लेखक सुचवीत आहे.

पुस्तकाचा मुख्यभर अमेरिकेवर असला तरी भारतीय वाचकांनाही आपले भवितव्य कसे घडणार आहे याबद्दलही लेखकाने धाडसाने मांडणी केलेली आहे. अर्थक्रांतीच्या वेगळया मार्गाचे यात दर्शन घडते.

अमेरिकेत ट्रंप यांनी 'स्वदेशी' ची चळवळच हाती घेतल्याचे घोषित केले आहे. भारतात मेक इन इंडिया चा नारा घुमतोय. लेखकाचे याबद्दलचे भाष्यही लक्षवेधी बोलके आहे.

मान्यवरांचे अभिप्राय:

एच. एम. देसरडा, कुमार केतकर, जयराज साळगावकर, आर. के. शेवगावकर, रवि बात्रा, भारतकुमार राऊत, निरंजन राजाध्यक्ष

अपेक्षित मुळे, मुळे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'

मायक्रो (समष्टिीय अर्थशास्त्रीय विभाग ISBN 978-8-174255-81-5