आपल्याकडे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांमध्ये तिचे सीतेचे नाव आवर्जून घेतले जाते.
सीतेची कथा ही एका त्यागमयी स्त्रीची कथा आहे. पतिव्रता असूनही परित्यक्तेचे जीवन शेवटी तिच्या वाट्याला आले. मानवी स्वभावाला शोकांतिकाच भुरळ घालतात. त्यामुळेच की काय सीतेचीही शोकांतिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.