व्हाईट एप्रन (सफेद कोट) म्हणजे डॉक्टरांनी परिधान करावयाची अपरिहार्य पोशाखी बाब नसून वैद्यकिय व्यवसायातल्या निष्कलंक आणि समर्पित जीवनाचे प्रतीक आहे.
हा सफेद कोट प्रत्येक डॉक्टरला हिपोक्रॅटिक शपथेची व त्या अनुषंगाने रुग्णांप्रती असलेल्या विशेष जबाबदारीची जाणीव करून देतो. या कोटाच्या आत दडलेल्या कर्तव्याची ही कहाणी वैद्यकीय व्यवसायात नव्याने पदार्पण केलेल्या व करू इच्छिणाऱ्या भावी डॉक्टरांना प्रेरक व उद्बोधक ठरेल अशी आशा वाटते.
माझे असंख्य चाहते, रुग्ण व नव्याने तयार होणारा आदरणीय वाचकवर्ग या प्रांजल आत्मकथेची दखल घेतील, कौतुक वा टीका करतील याची मला विनम्र जाणीव आहे. उभयपक्षी लाभार्थी मीच असेन. कौतुक झाल्यास या वयातही पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्याची सुखद अनुभूती मिळेल व टीका झाल्यास माझ्यातल्या त्रुटींची जाणीव होऊन सुधारण्याची संधी मिळेल.
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन डेक्कन जिमखाना, पुणे ४
अन्ततः फैसला तुमच्या हातात !