गुरुवर्य कै. प्रा. गो. म. कुलकर्णी निधन ४ एप्रिल २००१
जन्म २९ डिसेंबर १९१४
प्रा. गो. म. कुलकर्णी यांच्याशी वैचारिक स्नेह जुळल्यापासून छोट्या-मोठ्या भेटीगाठींतून अनेक विषयांबरोबरच मी त्यांच्याशी वाङ्मयेतिहास या विषयावरही चर्चा करीत राहिलो. ते जेव्हा जेव्हा भेटत, त्यांना जेवढी नि जशी सवड असे, तेवढ्या अवकाशात वाङ्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान, वाङ्मयेतिहासातील प्रश्न, वाङ्मयेतिहासाची मांडणी, वाङ्मयेतिहासाचे अध्यापन अशा विविध विषयांवर त्यांच्या-माझ्या चर्चा चालत.
आम्हा दोघांमधील हा मुक्तसंवाद वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असे वाटते.
द.दि. पुंडे