श्री सुभाष दत्तात्रय कुलकर्णी
एम.ए., बी.एड. अ. ए. सोसायटी, अहमदनगर ह्या संस्थेच्या शाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्य. शिक्षक व विद्यार्थी प्रिय शिक्षक. लेखन, वाचन, ललितकला, समाजकार्य यांची आवड.
वेद अपौरुषेय आहेत म्हणजे मानव निर्मित नाहीत. ऋषी हे मानव असल्याने त्यांनी ते लिहिलेले असू शकत नाहीत. जर त्यांनी ते लिहिलेले असतील तर त्यांना मंत्रकर्ते म्हटले असते. त्यांना मंत्रद्रष्टे म्हटले जाते. याचा अर्थ असा की त्यांना ते सापडले, त्यांनी ते शोधले. त्यांनी ते रचले नाहीत. कोलंबसाने अमेरिका शोधली म्हणजे निर्माण केली नाही. जी अस्तित्वात होती ती त्याने जगाच्या निदर्शनास आणली. न्यूटन, आईनस्टाईन यांनी नियम निर्माण केले नाहीत. गुरुत्वाकर्षण न्यूटनपूर्वीही होते. त्यांना ते नियम समजले आणि त्यांनी ते प्रथम जगापुढे आणले. ऋषींपूर्वी मंत्र होते. त्यांनी ते शोधले म्हणून त्यांची नावे मंत्रांना जोडली गेली. त्यांनी
मंत्रांचा मानवांना परिचय करून दिला. हे ऋषींचे श्रेय होय.