आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात की त्यांच्या स्वभावाचे गणित मांडता येत नाही. नेहमीचे आडाखे खोटे पडतात. भवती काय जळतय याचा त्यांना पत्ता नसतो. समोर नुकसान दिसत असतानाही त्या बेदरकारपणे वागतात. नमते घेणे त्यांना ठाऊक नसते. एककल्ली, आतताई, हेकट अशी विशेषणे त्यांना बहाल केली जातात. अवहेलना, अपमान पदरी पडतात. पण कशाचीच पर्वा करायची नाही हा त्यांचा स्थायीभाव. अवलिया - म्हणजे अशा काही व्यक्तींवर लिहिलेल्या कथा.