Rs. 175.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

STORY

परिचय

पुण्याच्या कनिष्ठ मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म २२ मे १९२८ रोजी. बालपणानंतर लगेच म्हणजे वयाच्या नवव्या वर्षापासून घरची कामे करणे जरुरीचे होते. अगदी शेणाने जमीन सारवणे, गिरणीतून दळण आणणे यासकट' ! घरचे कोणतेही काम करण्याची लाज वाटता...

  • Book Name: Chakoribaher (चाकोरीबाहेर ) by Gajanan Sathe
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 16

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Chakoribaher (चाकोरीबाहेर ) by Gajanan Sathe
- +
STORY

परिचय

पुण्याच्या कनिष्ठ मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म २२ मे १९२८ रोजी. बालपणानंतर लगेच म्हणजे वयाच्या नवव्या वर्षापासून घरची कामे करणे जरुरीचे होते. अगदी शेणाने जमीन सारवणे, गिरणीतून दळण आणणे यासकट' ! घरचे कोणतेही काम करण्याची लाज वाटता कामा नये व स्वावलंबन शिकणे या गोष्टींमुळे व शिक्षणामुळे जीवनमूल्ये रुजली जातात ही आईवडीलांची शिकवण. सुदैवाने पुण्याच्या नू.म.वि. हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण. मॅट्रिक परीक्षा 'वुइथ डिस्टिंग्शन' पास होईपर्यंत प्राप्त केले. नंतर फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. झाले. फेडरल सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेतून इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्विससाठी निवड १९५३ मध्ये झाली. असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर या 'ज्युनिअर मोस्ट' पदापासून अॅडिशनल जनरल मॅनेजर मध्य रेल्वे पदापर्यंत ३२ वर्षांची यशस्वी वाटचाल. याच काळात चार वर्ष शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये व नंतर इंडियन रेल्वेच्या 'राईट्स' कंपनीतून पूर्व आफ्रिकेतील 'मोझांबिक' देशात चीफ कन्सल्टंट अँड अॅडवायझर टु नॅशनल डायरेक्टर रेल्वे अँड पोर्ट्स म्हणून काम केले.

लहानपणापासून पुण्यातील श्री शिवाजी कुल या भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या संस्थेत स्काऊट शिक्षण मिळाले. तेथे कै. डॉ. मो. ना. नातू व कै. डी. पी. जोशी या असामान्य गुरुद्वयांकडून 'शरीराने सुदृढ, मनाने जागरुक व नीतीने शुद्ध' असा नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन लाभले. या शिकवणीचा आदेश सरकारी रेल्वेमध्ये कार्यरत असतानाही दृष्टीसमोर ठेवला. भारत स्काऊट्समध्ये अनेक वर्ष सक्रीय भाग.