व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेने सुमारे ५० वर्षापूर्वी सर्वसामान्य बाचकांचे लक्ष ग्रामीण वास्तवाकडे वेधले, भारत हा असंख्य खेड्यांचा देश आहे, हे जाणवून दिले. गावाकडच्या माणसांचे जग, त्यातील मूल्ये, संघर्ष, नातेसंबंध विजिगीषा वृत्ती पासंबंधी ताकदीने व धाडसाने लिहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा साहित्यिक बारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रतिष्ठान स्थापन केले गेले. प्रतिष्ठानतर्फे नबोदित लेखकांकडून ग्रामीण जीवनावरील कथा मागविण्यात आल्या होत्या. त्या वाचल्यानंतर असे जाणवले की आजची तरुण पिढी ग्रामीण जीवनाकडे प्रगल्भपणे पाहते आहे. या कथा संबेदनशील व भावनाप्रधान आहेत. त्यात भाषेचा अस्सल बाण दिसतो. सामाजिक जाणीव, व्यक्तीच्या वागण्यामागची कारणमीमांसा, एखाद्या घटनेचा गावगाड्याशी असलेला संबंध याचे भान या लेखकांकडे आहे याची साक्ष मिळते; बाचताना वृत्ती खिळवून टाकणारे जीवनदर्शन या कथांमधून होते. या संग्रहातील कथा सर्वसामान्य बाचकांना हृदयस्पर्शी वाटतील, तर उदयोन्मुख लेखकांना प्रेरणादायी ठरतील
MADGULKAR PRATI VYANKATESH