Rs. 125.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

सौ. जयश्री भडकमकर यांच्या या मनचिंतन संग्रहात त्यांनी मनाचे स्वरुप, मनाचे खेळ, मनाची कार्यपद्धती यासंबंधी सोप्या भाषेत आपले विचार मांडले आहेत. संत रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. मनावर अनेकांनी मनासारखे किंवा मनमानी लेखन केले आहे. 'मन मनास उमगत नाही' हेच...

  • Book Name: Manpakhru (मनपाखरू) By Jayashree Bhadkamkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 17
  • Barcode 9.78817E+12
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Manpakhru (मनपाखरू) By Jayashree Bhadkamkar
- +
सौ. जयश्री भडकमकर यांच्या या मनचिंतन संग्रहात त्यांनी मनाचे स्वरुप, मनाचे खेळ, मनाची कार्यपद्धती यासंबंधी सोप्या भाषेत आपले विचार मांडले आहेत. संत रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. मनावर अनेकांनी मनासारखे किंवा मनमानी लेखन केले आहे. 'मन मनास उमगत नाही' हेच खरं. थोर नाटककार शेक्सपिअरने मनाला Pandora's Box म्हटले आहे. लेखिका उत्तम व निष्ठावंत शिक्षिका आहेत. बालमानसशास्त्राचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. शिवाय त्या प्रयोगशील व कृतिशील लेखिका आहेत. त्यांचे निरीक्षण, त्यांचा अभ्यास, मनविषयक चिंतन या सर्व घटकांचा प्रत्यय त्यांचे हे लेखन वाचताना येतो. सर्वसामान्य वाचकाला 'मन' म्हणजे काय हे स्वानुभवाशी पडताळून पाहताना समजावे अशा रीतीने लेखिकेने हे लेखन केले आहे. आधुनिक काळात आपल्या दैनंदिन जीवनातही कौटुंबिक समस्या, नातेसंबंधातील ताणतणाव याचा खूपच प्रादुर्भाव आहे. त्यामुळे मानसशास्त्राला आणि समुपदेशनाला कधी नव्हते एवढे महत्त्व आलेले आहे. यासंबंधीचे विचार परकाया प्रवेश या प्रकरणात वाचायला मिळतील. एक उपयुक्त, मार्गदर्शक आणि चिंतनात्मक पुस्तक लिहिल्याबद्दल मी लेखिकेचे 'मनोमन' अभिनंदन करून त्यांच्या मनविषयक लेखनाला शुभेच्छा देतो. वाचकांनी या लेखनाचे मनापासून स्वागत करावे असा मनोदय व्यक्त करतो.