घर, संसार सांभाळून आता घरची कर्ती स्त्री नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने 'घराबाहेर' ही पडली आहे. एकटी जिद्दीनं, स्वतंत्र जबाबदाऱ्या स्वीकारू लागलीय. नव-नव्या आव्हानांना सामोरी जाऊ लागलीय. या तिच्या वाटचालीत तिचं मुळातलं 'स्त्री मन' कणखर बनत चाललंय का ? ती कुणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतंत्र निर्णय घेऊ शकतीय का ? टाळाव्याशा वाटणाऱ्या माणसांना अपरिहार्यपणे सामोरं जावं लागल्यावर ती अद्याप गुदमरतीय का ? अधिकारीपदावर पोचल्यावर सहकारी पुरुषांच्या दादागिरीला न्यूनगंडाला कशी हाताळतीय ? स्वतः प्रगतीपथावर असताना समाजात अद्याप शिल्लक असलेल्या रूढी- परंपरांकडे, स्त्रीवरच्या अन्यायाकडे कशा पद्धतीने बघतीय ? चांगुलपणा असलेली माणसं तिला भेटतच नाहीत, की भेटतात ?
अशा अनेक गोष्टींचा शोध घेत पुढे सरकणाऱ्या स्त्री मनाच्या कथांचा हा संग्रह. सहज, ओघवत्या शब्दात वाचकाला शेवटच्या पानापर्यंत घेऊन जाणारा. संकटांचा बाऊ न करता, त्यांना 'वळसा' घालून पुढे जायला शिकवणारा.....
सुधीर गाडगीळ