Your cart is empty now.
ज्या वयात तरूण पिढी आपल्या करियरच्या दिशेबाबत संभ्रमात असते, त्या वयात म्हणजे अवघ्या २२ व्या वर्षी देवेंद्रजींनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, सर्वात तरुण महापौर ते वयाच्या ४४ व्या वर्षी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्रजीच्या यशस्वी कारकिदीमागे त्यांनी सातत्याने जाणीवपूर्वक स्वतःला घडवण्याचे केलेले प्रयत्न आहेत, जोपासलेली जीवनमूल्ये आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः चे चारित्र्य आणि जीवनमूल्यांशी तडजोड न करता कुशल रणनीती आखणारा हा नेता कसा घडला, याचा अभ्यास राजकीय विश्लेषक, विरोधक, सर्वसामान्य नागरिक तसेच या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल.