एखाद्या शहराचा इतिहास हा त्याच्या वर्तमानाचे संचित व भविष्यकालीन वाटचालीसाठी मार्गदर्शक असा दस्तऐवज असतो. म्हणूनच दैनंदिन घटना, घडामोडी यांच्या नोंदींना अतिशय महत्त्व आहे. आज पुणे शहराचा विस्तार आणि वैभव किती तरी पटीने वाढले आहे. २१व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात झपाट्याने झालेल्या या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर वाटचाल करीत असताना आपण काय कमावलं, काय गमावलं याचा आढावा घेणे ऐतिहासिकदृष्ट्या उपयुक्त व महत्त्वाचे आहे. या उद्देशानेच पुणे शहर व परिसरात २००१ ते २०२१ या कालावधीतील अशाच काही महत्त्वाच्या घटना, नोदींचा वेध घेणारा हा संदर्भ ग्रंथ वाचकांना, अभ्यासकांना व जिज्ञासूंना उपयुक्त असा आहे.