हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात ललिता गंडगीरांचा हातखंडा आहे. गेली अनेक वर्षे या एकाने लिखाण करत असून अतिशय बारकाव्यानिशी इकडच्या राहणीतील अनेक पैलूंवर चित्रित केलेल्या लिखाणाने अल्पावधीतच त्या एकताच्या वाचकांच्या आवडत्या लेखिका झाल्या यात नवल नाही. ह्या पुस्तकातील सर्वच लेख लेखिकेच्या प्रसन्न व मोकळ्या मनाची साक्ष देतात. आजूबाजूच्या जगात जे पडते ते कुठेतरी त्यांच्या मनावर आघात करते. - पण या आघाताची कारण परंपरा शोधण्याची ओळ त्यांच्या मनात नाही. ठळकपणे जे जे जाणवलं ते सांगून टाकायच्या वृत्तीपोटी यातले अनेक लेख आकाराला आले आहेत. ललिताताईचे लिखाण वाचताना त्यांच्या चिंतनशील वृत्तीपेक्षा वेगळ्या दिशेने विचार करण्यासाठी धडपडणाऱ्या मनाचा प्रत्यय अधिक येतो. एकतात लिखाण करण्याव्यतिरिक्त भारतातल्या वहिनी, सुहासिनी, वायशोभा, मानिनी, भावना, स्नेहप्रभा, माहेर इत्यादी मासिकांतही त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. एवढेच नाही तर इंग्रजीतून लिहिलेल्या त्यांच्या कथांच्या स्वीकार 'जर्नल ऑफ साऊथ एशियन लिटरेचर-मिशिगन युनिव्हर्सिटी व जर्नल ऑफ साऊथ एशियन रिव्ह्यू' ह्या पत्रकांनी केला आहे. तसेच इंडिया ट्रिब्यून शिकागो, ओव्हरसीज ट्रिव्यून-वॉशिंग्टन डि. सी. आणि इंडो-अमेरिकन न्यूज-ह्यूस्टन टेक्सास ह्या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांत त्यांनी बरेच लिखाण केले आहे.