Your cart is empty now.
लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांमध्ये आणखीही एक सामर्थ्य आढळून येते, ते म्हणजे तत्कालीन प्रश्नांची चर्चा करताना ते केव्हा केव्हा चिरंतन महत्त्वाचा विचार मांडतात. 'सनदशीर की कायदेशीर' या अग्रलेखात ना. गोखल्यांच्या भूमिकेवर टीका करताना लोकमान्य टिळकांनी 'कायदा आणि नीती यांची जेव्हा फारकत होते तेव्हा कायदा मोडून नीतीचे पालन केले पाहिजे' हा विचार मांडला आहे. शाश्वत विचार सांगून भविष्याचा वेध घेण्याच्या लोकमान्य टिळकांच्या सामर्थ्यामुळेच त्यांचे अग्रलेख मराठी पत्रकारितेचे भूषण ठरले. लोकमान्य टिळकांच्या ७५ व्या पुण्यतिथीस 'अग्रलेखकार लोकमान्य टिळक' हे पुस्तक प्रसिद्ध होण्यात मोठेच औचित्य आहे. त्या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे अभिनंदन.
-ग. प्र. प्रधान ज्येष्ठ प्राध्यापक, विचारवंत