डॉ. अरविंद नीळकंठ नवरे
पीएच.डी., एफ.सी.एस., एफ.सी.आय.एस. (लंडन), शर डी.बी.एम्. (जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई), एम. आय. आय. ए., ए. एम. आय. एम.ए., बी.कॉम., बी. ए., एल.एल.बी.
वयाच्या ७२ व्या वर्षी पुणे विद्यापीठाची
'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' विषयात पीएच.डी. प्राप्त. पुण्यातील सुमारे ६०० कंपनी सेक्रेटरींमधील पहिले मान्यताप्राप्त कंपनी सेक्रेटरी.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स (पुणे) च्या कॉर्पोरेट लेजिस्लेशन कमिटीचे माजी अध्यक्ष. इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे व पुणे शाखेचे भूतपूर्व अध्यक्ष आणि या इंस्टिट्यूटच्या नवी दिल्ली येथील मध्यवर्ती समितीवर पुण्यातून निवडून गेलेले पहिले
प्रतिनिधी. 'डब्लू. आय. आर. सी. फोकस' या इंस्टिट्यूटच्या
मासिकाचे प्रवर्तक. भारत सरकार व सेबीतर्फे पुणे स्टॉक एक्सचेंजवर
डायरेक्टर - लोकप्रतिनिधी. एक्सचेंजच्या
समित्यांवर प्रतिनिधित्व.
नरसी मोनजी कॉलेज मुंबई व इतरत्र अध्यापन व
भाषणे.
विवेकानंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थेचे एक संस्थापक
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे या लो. टिळक व इतर मान्यवरांनी ११४ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या
EPSON संस्थेचे सहकार्यवाह
सुमारे ३५ सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक व वाङमयीन संस्थांशी निरनिराळ्या नात्याने निगडित.
'झलक: अमेरिकन जीवनाची' या पुस्तकाचे लेखक. 'प्रवास वर्णनाची नावीन्यपूर्ण पद्धत' असा महाराष्ट्र टाईम्सचा अभिप्राय.
अमेरिका, चीन, मलेशिया, सिंगापूर, कॅनडा इ.
देशांतून प्रवास.
'चिंतन आशय' या पुणे आकाशवाणीच्या चिंतन कार्यक्रमावर आधारित लेखकाचे मुंबईतील चिरंजीव अजित यांना लिहिलेल्या रोजच्या पत्रलेखनाची संख्या २७०० च्या वर आणि 'लिम्का बुक ऑफ
रेकॉर्डस'मध्ये २००५ सालापासून सलग ५ वर्षे नोंद. आय. एल. एस. लॉ कॉलेज, पुणे येथे १९६२ साली शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक. मुंबई विद्यापीठाच्या डी.बी. एम. (पार्ट वन) या मॅनेजमेंटच्या परिक्षेत प्रथम क्रमांक.
शालेय जीवनात 'साहित्य प्राज्ञ' प्राप्त. मराठी बालभारती इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात (२००९) 'अंदमान - राष्ट्रीय तीर्थस्थान' या लेखाचा समावेश.