गड्या, तुला कितीही शाबासकी दिली तरी ती थोडीच ठरेल. तू कल्पनेतला खाजगी गुप्तपोलिस ! पण आम्हाला तू खराखुरा जिगरदोस्त वाटतोस : शंभर वर्षं लोटली ! तरी तू साऱ्या जगाची कथासृष्टी गाजवतो आहेस ! आपल्या बुध्दिचातुर्याने अन् बेधडक वृत्तीने ! जगातले तमाम गुन्हेगार तुझं नाव कानावर पडलं की चळाचळा कापतात ! तुझा तो बाभडा जिवलग मित्र डॉ. वॉटसन् आमचाही जिवलग मित्र बनला आहे कारण त्यानेच तर शरलॉक होम्सच्या साहसकथा आम्हाला सांगितल्या ! अर्थात् त्याचा बोलविता धनी वेगळाच होता : सर ऑर्थर कॉनन डॉइल. शरलॉक होम्सच्या शौर्याने अन् चातुर्याने भरलेल्या चटकदार गोष्टींचा हा पाच पुस्तकांचा संच.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.