माणुसकीचा किंवा माणसातल्या चांगुलपणाचा शोध खरं म्हणजे कधीच न संपणारा आहे; पण तरीही या दृष्टीनं कुठलाही माणूस शोधायला गेलं की त्याचे किती तरी नवनवे पैलू पुढं येतात..... मोठेपणा मिरवणाऱ्या माणसांची ओंगळ रुपं कधी दिसतात; तर सामान्यांचं जिणं जगणाऱ्यांमधले असामान्यत्वं आजच्या अंधकारमय वातावरणात उत्साहाचा-आशेचा प्रकाशकिरण देऊन जातं... धडपड्या वृत्तीनं आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याला आकार देणारी कर्तबगार माणसं पाहिली म्हणजे कुणालाही बळ उभारी मिळेल. अशी माणसं आपापल्या कुवतीनुसार आपापल्या चौकटीत काही प्रामाणिक धडपड करतात आणि ती यशस्वी ठरते. 'हे कसं केलं' या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता आलं नाही, तरी अशा व्यक्तींचं आयुष्य हेच या प्रश्नाचं उत्तर असतं. 'सकाळ'चे मुख्य वार्ताहर राजीव साबडे यांना पत्रकारितेच्या दोन दशकांच्या वाटचालीत अशी काही माणसं जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाली. या आगळ्या-वेगळ्या व्यक्तींच्या अंतरंगाचा वेध त्यांनी वर्षभर ‘रविवार सकाळ' मधील मालिकेतून घेतला. 'व्यक्तिरंग' हे या मालिकेतल्या व्यक्तिचित्रणांचं संकलन आहे. उत्कर्ष प्रकाशन
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.