Your cart is empty now.
Ase Hote Pune ( असे होते पुणे) by M S Dixit
श्री. म. श्री. दीक्षित (वय ७७) हे पुण्यातील एक प्रसिद्ध लेखक आणि सार्वजनिक कार्यकर्त. मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास हे त्यांचे आवडीचे आणि अभ्यासाचे विषय. चारित्रात्मक अशी वीस एक लहानमोठी पुस्तके त्यांच्या नावावर असून त्यापैकी दहा-बारा पुस्तकांच्या आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद, वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, भा. इ. सं. मंडळ, पुणे सार्वजनिक सभा, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे ऐतिहासिक वास्तु स्मृती, महाराष्ट्र चित्पावन संघ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था इ. आठ-दहा संस्थात विविध नात्याने ते विधायक सेवा करीत आले आहेत.
पुणे शहराविषयी. श्री. दीक्षित यांचे मनी अपार प्रेम आहे. शिवकालापासून ते विसाव्या शतका अखेरच्या पुण्यातील नानाविध घटनाप्रसंगांचा त्यांच्या नित्य अभ्यास चालू असतो. त्यांच्या या पायपिटी अभ्यासाचे फलित म्हणजेच 'असे होते पुणे'
हा त्यांचा ग्रंथ. 'केसरी' त वर्षभर (२०००) दर रविवारी प्रसिद्ध झालेले लेख आणि इतरत्र प्रसिद्ध झालेले काही लेख मिळून हा ग्रंथ संस्कारण करून सिद्ध झालेला आहे. वाचकांना तो आवडेल अशी आशा आहे.