Your cart is empty now.
काही माणसे मळलेल्या वाटांनी जाण्यातच धन्यता मानतात. जीवनात अनेक वाटा चोखाळून पहाणारी, नानाविध अनुभव घ्यावे आणि आपले आयुष्य समृद्ध करावे असे वाटणारी माणसेही या जगात आहेत. राजीव बर्वे त्यांच्यापैकीच एक आहेत. प्रकाशन व्यवसाय करीत असताना त्यांना चित्रपट निर्मितीचे क्षेत्रही खुणावत होते. तिथेही त्यांनी मुशाफिरी केली. चांगले वाईट अनुभव घेतले. निखळ प्रेम करणारी आणि व्यवहाराच्या पलीकडे कशाचाही विचार न करणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे त्यांना भेटली, त्या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी ‘मनातली माणसं’ या पुस्तकात रेखाटली आहेत